ग्रामपंचायत बामणी

ग्रामपंचायत बामणी

Grampanchayat Bamni

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.

- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअभियानाचा हेतू -

• विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
• लोकांचे जीवनमान उंचावणे
• नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
• आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बामणी ग्रामपंचायतने केलेली कामे

1.सुशासन युक्त पंचायत (Good Governance Panchayat)

🏛️ 1.1 लोकाभिमुख प्रशासन

ग्रामपंचायतीत नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत पारदर्शक, जलद आणि उत्तरदायी प्रशासन कार्यरत आहे. सर्व अर्ज, नोंदी व सेवा व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या जातात.

🏢 1.2 नागरी सेवा सुविधा केंद्र

एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा—दाखले, प्रमाणपत्रे, जन्म/मृत्यू नोंदी, कर माहिती—नागरिकांची वेळ वाचवण्यासाठी आधुनिक सुविधा केंद्र.

📮 1.3 तक्रार निवारण

ग्रामपंचायतीत तक्रार पेटी व डिजिटल तक्रार नोंदणी प्रणाली. नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदवून वेळेवर व पारदर्शक पद्धतीने निवारण.

नागरिकांसाठी तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची QR Code & Link सुविधा उपलब्ध आहे. तक्रारी आपण सहजपणे ऑनलाइन सादर करू शकता.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली तक्रार तत्काळ आणि सोप्या पद्धतीने नोंदवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

🌐 1.4 ग्रामपंचायत वेबसाइट –

ग्रामपंचायतीतील सर्व योजना, विकास कामे, महत्त्वपूर्ण सूचना, सेवा आणि माहिती नागरिकांना घरबसल्या पाहता येते

♿ 1.5 दिव्यांग 5% निधी वापर

दिव्यांग नागरिकांना सहाय्य, साधनसामग्री आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायतीचा 5% निधी सुयोग्य पद्धतीने वापरला जातो.

2) सक्षम पंचायत (Financially Efficient Panchayat)

💰 2.1 कर भरणा जागृती

ग्रामपंचायत कर भरणा जागृतीसाठी डिजिटल साधने (QR कोड, ‘महा ई ग्राम सिटीझन ॲप’) वापरणेवेळेत कर भरणाऱ्यांना सवलत देणे, आणि ग्रामसभा व फलकांद्वारे माहिती पोहोचवणे यांसारखे उपाय योजले जातात, जेणेकरून नागरिक वेळेत कर भरून गावे स्वयंपूर्ण बनतील आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल, कारण करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर गावातील विकासकामांसाठी होतो

3) जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव

💧 3.1 रेन वॉटर हार्वेस्टिंग

गावातील सर्व अंगणवाडी आणि शाळांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था तयार करून जलसंधारणाचा उत्तम आदर्श निर्माण. यामुळे जमिनीतील पाणीसाठ्यात वाढ आणि पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता सुधारते.

🚿 3.2 सूक्ष्म सिंचन (Micro Irrigation)

शेतकऱ्यांना ठिबक, फवारणी यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन, ज्यामुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ

☀️ 3.3 ग्रामपंचायत,शाळेत आणि अंगणवाडी सौर युनिट

ग्रामपंचायत कार्यालयात,शाळेत आणि अंगणवाडीत सौरऊर्जा प्रणाली बसवून वीजबचत आणि पर्यावरणपूरक उर्जा वापर वाढवला आहे.

🌳 3.4 वृक्ष लागवड व संवर्धन

रस्त्यांच्या कडेला, शाळा परिसरात व सार्वजनिक जागांवर वृक्षलागवड; नियमित देखरेख आणि पाणीपुरवठा.

🧹 3.5 मासिक स्वच्छता उपक्रम

दर महिन्याला ग्रामस्थांच्या श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते.

🚫 3.8 प्लास्टिक बंदी- प्लास्टिकमुक्त गाव

गावात प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

♻️ 3.9 घनकचरा व्यवस्थापन

प्रत्येक घरात कचरा वर्गीकरणासाठी कुंड्या वाटप करण्यात आल्या आहेत.

4.मनोरेगा आणि इतर योजना अभिसरण

🚜 4.1 शेत व गाव रस्ते विकास

MREGS अंतर्गत शेत रस्ते, पाणंद रस्ते आणि गावांतर्गत रस्त्यांचे कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आली आहेत.

5) संस्था सक्षमीकरण (Institutional Development)

🏛️ 5.1 ग्रामपंचायत मिटिंग हॉल

व्यवस्थित आसनव्यवस्था, प्रतीक्षालय आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त हॉल.

🪑 5.2 सरपंच/उपसरपंच कार्यालय व्यवस्था

सरपंच/उपसरपंच/अधिकारीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था

🚻 5.5 स्वच्छतागृह : मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह ​

जी.प. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ शौचालये.

🎨 5.6 रंगरंगोटी व सुशोभीकरण

ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळांचे सौंदर्यीकरण.

🚰 5.8 स्वच्छ पिण्याचे पाणी

शाळा व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित पिण्याचे पाणी.

⚰️ 5.14 सुसज्ज स्मशानभूमी

गावात स्मशानभूमीसाठी शेड, बाकडे, पिण्याचे पाणी आणि रस्ता तयार करण्यात आले आहेत.

🐄 5.15. पशुवैद्यकीय सेवा

जनावरांसाठी खोडा उपलब्ध असून नियमित लसीकरण केले जाते.

🏋️ 5.16 खुली व्यायामशाळा

सर्व नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा उभारण्यात आली असून ती नियमित वापरली जाते.

6)उपजीविका विकास व सामाजिक न्याय

🏠 6.1 घरकुल योजना

गरजूंना घरकुल योजना अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

👩‍👩‍👧‍👧 6.2 महिला बचत गट - व्यवसाय प्रशिक्षण

गावात अनेक महिला बचत गट स्थापन असून त्यांना कर्ज सुविधा आणि “लखपती दीदी” उपक्रम राबवला जात आहे.

महिलांना व्यवसाय प्रशिक्षण -शिक्षण, उद्योग, कौशल्य प्रशिक्षण.

7) लोकसहभाग (People’s Participation)

🧹 7.1 स्वच्छता श्रमदान

दर महिन्याला श्रमदानातून गावातील स्वच्छता.

8)नाविन्यपूर्ण उपक्रम (Innovative Activities)

9) डिजिटल ग्रामपंचायत व इतर सेवा

🌐 9.1 ऑनलाइन दाखले व डिजिटल सेवा

ग्रामपंचायत नागरिकांना ऑनलाईन दाखले, तसेच “मेरी पंचायत”, “पंचायत निर्णय” आणि “ग्राम संवाद” अ‍ॅप्सचा वापर करण्यात मदत करते.

💳 9.2 QR कोड करवसुली

गावात करवसुलीसाठी QR कोड पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.